Wednesday, April 17, 2013

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर 1680 च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.

तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (1689) चा हा केवळ नऊ वर्षांचा काळ महत्त्वाचा आहे.”
“अवघे तेवीस वर्षांचे वय. औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती. मात्र त्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. त्या नऊ वर्षांच्या काळात
त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तर संवर्धनही केले. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.
राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकले असते.
ही कामगिरी “केवळ अद्‌भुत’ म्हणता येईल अशीच आहे. जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.
उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह वा माघार नसलेल्या 240 लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),
पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा
विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला.
नऊ वर्षांत 240 लढाया करणारे युवराज संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.
स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला.
नवी गावे बसवली. व्यापारी पेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले.
आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.
लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली.
वाटते तेवढे सोपे नाही. अद्‌भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.”
“संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली, की मुअज्जम आणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याची
व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदत करण्याचे धाडसदेखील केले नाही. उलट संभाजीराजांचा
मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.
मोगलाईला धोका होता म्हणून…
“”मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व शाह्या या बादशहांच्या होत्या. स्वराज्याचा प्रयोग भारतभर पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरण होते.
म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य उद्‌ध्वस्त करण्यास दक्षिणेत आला.
पण स्वतःचं राज्य समजून मराठी जनता प्राणपणानं लढली. संभाजीराजांचं हौतात्म्य त्यांच्यासमोर आदर्श होता.
म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं. त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही. त्याचा महाराष्ट्रातच अंत झाला.”

शिवरायांचा दरारा- संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत.

"शिवरायांचा दरारा"
संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….
ते पत्र :-

Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता..

दिनेश सूर्यवंशी , तुळजापूर.

।। गनिमीकावा ।।

"गनिमी कावा" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक युद्धतंत्र होते. " कमीत कमी फोजेने जास्तीत जास्त फोजेचा खातमा करणे आणि विजय संपादन करणे ". या तंत्राचा वापर करून महाराजांनी भल्या भल्या शत्रूला सळो कि पळो करून सोडले, धुळीस मिळवले आणि विजय संपादन केले. म्हणून महाराजांना " गनिमी कावा " या युद्धतंत्रचे जनक मानले जातात.
महाराजांचा एक भीषण गनिमी कावा…
शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला. या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोरहोता की , त्याने म्हटले की , ‘ हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पणकोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.
कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला।
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे ,गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला. खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली। खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे. पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती.शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाईरायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ‘ आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी.
‘ यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला की , ‘ मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी. हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: ऊंबरखिंडीत तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी हलकल्लोळ उडाला, मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना.
याला मनतात गनिमी कावा ......... याचा वापर करून महाराजांनी भल्याभल्याना पाणी पाजले.

Friday, March 29, 2013

"पाचाड(रायगड) येथील जिजाऊंचा वाडा"

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स. १४ मे, १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे' निधन, संभाजीराजांच्या लहान वयात झाल्यामुळे त्यांच्या पालनपोषनाची जबाबदारी जिजाऊंनी पार पाडली.पुढे संभाजीराजा इतिहासातील एक थोर,बुध्दिमानी,अजिंक्य पराक्रमी राजा म्हणून उदयास आला.

तिकडे दक्षिणेत आपल्या जनतेची काळजी शहाजीराजे अगदी पुत्रासारखी घेत होते.आपल्या प्रजेची जंगलातील नरभक्षक वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे बेंगलोर नजिकच्या होदेगिरीच्या जंगलात गेले होते.वाघाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून त्यांचा दुदैवी मृत्यु झाला.ही दुदैवी घटना इ.स.२३ जानेवारी १६६४ रोजी घडली.

अशा दु:खद प्रसंगी पतीविरहाचे दु:ख बाजूला ठेवून जिजाऊंनी स्वराज्याच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले.या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची,स्वराज्यप्राप्तीची,गुलामगिरीतून लोकांना सोडविण्याची प्रबळ प्रेरणा होती.स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.

राज्याभिषेक.

इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.

आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'


श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.

"पाचाड(रायगड) येथील वाड्यातून दिसणारे रायगड किल्ल्याचे विहंगम दृश्य"

।।लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू।।

छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला.छत्रपती राजर्षी शाहूंचे पूर्वाश्रमाचे नाव यशवंतराव होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्युनंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.लहानपणापासून ते शरीरयष्टीने तगडे व बलवान होते.विद्यार्थीदशेत त्यांनी विविध भाषेवर प्रभुत्व मिळविले.त्यांचे शिक्षण राजकोट,धारवाड येथे झाले.
बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांना राजाराम,शिवाजी हे मुलगे तर आक्कासाहेब,आऊबाई या दोन कन्या होत्या.सन १८९७-९८ साली पडलेल्या दुष्काळ व प्लेगच्या साथीचा त्यांनी कुशलपुर्वक मुकाबला करून प्रजेला त्यातून बाहेर काढले.



वेदोक्त प्रकरण
सन १८९९ साली कोल्हापूरातील धर्मपंडितानी शाहूंना शुद्र ठरवून त्यांचे क्षत्रियत्व अमान्य केले आणि शाहूंचा वेदमंत्राचा अधिकार नाकारला.अशावेळी शाहूंनी कठोर निर्णय घेऊन ब्रह्मवर्गांची वतने बरखास्त केली.वेदोक्त प्रकरणामुळे त्या काळात महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते.

महाराणी ताराबाई.


ताराबाई:
(? १६७५-९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३-८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले. मोगलांचा रायगडास वेढा पडला असता, जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी ताराबाईने राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेल्या नंतर ताराबाई व तिच्या इतर सवती रामचंद्र नीलकंठाच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. रामचंद्रपंतांच्या सहवासात ताराबाईला मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या. ९ जून १६९६ ला ताराबाईला मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी. राजाराम जिंजीहून निसटल्या नंतर ताराबाई आणि तिचे नातेवाईक जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले. त्यांना जुल्फिकारखानने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी ताराबाई व तिच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी राजाराम मृत्यू पावला. त्यानंतर ताराबाइंच्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात झाली.
शाहू मोगलांच्या कैदेत असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतीच्या गादीवर सांगू लागली. रामचंद्रपंताने शाहूची बाजू उचलून धरली, तेव्हा तिने परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण यांना आपल्या बाजूस वळवून घेतले आणि शिवाजीची मुंज करून विशाळगड येथे त्याला राज्यभिषेक करविला. ती आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागली. सैन्याधिकारी नेमून तिने औरंगजेबाशी उघड सामना सुरू केला. १७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर तिने पन्हाळा ही राजधानी केली. मध्यंतरी ताराबाईने औरंगजेबाशी बोलणी सुरू करून मुलासाठी  मनसब व दक्षिणेची देशमुखी अशा मागण्या केल्या. ही बोलणी फिसकटताच तिने जिद्दीने मोगलांशी लढा चालू ठेवला. गडागडांवर जाऊन ती जातीने पाहणी करी. सरदारांना सल्ला देई. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे, म्हणून तिने उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली. १७००—०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईच्या सैन्याने परत मिळविले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आला. तो तोतया नसून खरा शाहू आहे, याची खात्री ताराबाईने करून घेतली. मग पुन्हा मोगलांकडे त्यांची जमीनदार म्हणजे अंकित राहण्यास कबूल असल्याचा अर्ज केला, पण प्रथम तो फेटाळला गेला. पुढे त्यास संमती देण्याचा प्रयत्न झाला. पण तो निरुपयोगी ठरला. शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले. बाळाजी विश्वनाथाने ताराबाईच्या पक्षातील चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर इ. मातब्बर सरदार मंडळींना आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४ मध्ये राजसबाईने आपला मुलगा संभाजी यास पन्हाळ्यास छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी यांना अटकेत टाकले. शिवाजी १७२७ मध्ये बंदिवासातच मेला. पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली. तेव्हा शाहूने तिला मानाने वागविले. ती पुढे साताऱ्यास रहावयास गेली. १७४९ पर्यंत तिचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले.
आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून तिने शाहूचे मन वळविले. शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला सातारच्या गादीवर बसविले. त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा तिने प्रयत्न केला. रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पहाताच तिने तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला, रामराजास त्रास देई. १७५० मध्ये साताऱ्यात असता तिने रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने तिने साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी ताराबाईशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्यावर सैन्य नेताच ती पेशव्यांना शरण गेली. १७६० मध्ये संभाजी मेल्यामुळे पुन्हा वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपतचा पराभव (१७६१) ऐकल्यावर बरे झाले, असे पेशव्यांविषयी उद् गार काढून तारबाई मरण पावली. ताराबाई हुशार, राजकारणी व कारस्थानी होती. स्वतःचे हेर ठेऊन ती आपल्या विरूद्ध पक्षातील माहिती काढीत असे. तिचे खरे कतृत्व १७०० -०७ या निर्णायकी काळात दृष्टीस पडले. वैयक्तिक महत्वाकांक्षेपायी तिने निजामासारख्या  मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही. राजारामाच्या वारसाहक्कासाठी भांडून तिने कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. शाही स्वराज्यात येण्यापूर्वी तिने कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली. परंतु त्यानंतर मात्र तिचे उर्वरित आयुष्य घरगुती कलहात गेले.. 

संदर्भः Kishore, Brij, Tara Bai and Her Times, Bombay, 1963.